९ विद्यार्थी ऑल इंडिया रँकमध्ये चमकले
सावंतवाडी
जीपॅट २०२३ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीने सलग पाचव्या वर्षी या राष्ट्रीय परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे._
_महाविद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी ऑल इंडिया रँकमध्ये चमकले आहेत. यामध्ये अल्फिया समीर बेग ९९.३१, ,नम्रता मंगेश घाडी ९८.११, तन्वी लक्ष्मण राऊळ ९७.१६, नरेश बजरंग ताम्हणकर ९६.९१, आकांक्षा गजानन टक्के ९६.०३, श्रध्दा विद्याधर जुवेकर ९५.५९, मृणाली संजय कदम ८६.१०, आदिती राजेंद्र रोडगे ७७.५२ व जुई संतोष पारकर ३६.७६ यांचा समावेश आहे. यापैकी अल्फिया समीर बेग हिने विशेष प्राविण्य मिळवत ऑल इंडिया रँक ४३३ संपादित केली._
_यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या आजमितीपर्यंत चार बॅचेस उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये एकूण ३२ विद्यार्थ्यांनी जी-पॅट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. गतवर्षी कॉलेजचा नागेश कलशेट्टी याने याच परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत ऑल इंडिया रँक ६७ संपादित केली होती. सध्या तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, सासनगर येथे एमएस करीत आहे. पहिली बॅच उत्तीर्ण विद्यार्थी दुर्गेश बिडये जेएसएस, म्हैसूर येथे पीएचडी करत आहे. ३२ पैकी काही विद्यार्थ्यांनी|शासकीय महाविद्यालयातून तसेच अभिमत विद्यापिठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे तर इतर सर्व एमएस हि पदवी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (नायपर) येथे करत आहेत._
_जीपॅट परीक्षेच्या सरावासाठी कॉलेजने स्वतंत्र व तज्ञमार्गदर्शन तासिका घेऊन विद्यार्थ्यांना सहकार्य केले होते. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका तसेच परीक्षा अभ्यासाचे नियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत यामुळेच हे यश प्राप्त झालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले. जीपॅट परीक्षा मे महिन्यात संपूर्ण भारतात विविध केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेचा मुख्य उद्देश हा विद्यार्थ्यांना देशातील उत्तम महाविद्यालयात प्रवेश मिळावा हा आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेलया विद्यार्थ्यांना गुणवत्ते आधारे औषधर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला (एम. फार्मासिला) प्रवेश दिला जातो. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीदेखील मिळणार आहे._
_विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोंसले, प्राचार्य डॉ. विजय जगताप व स्पर्धापरीक्षा समन्वयक प्रा.डॉ.प्रशांत माळी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._