You are currently viewing संगीत संयुक्त मानापमान नाटकाचे नाट्यरुपांतर रवींद्र नाट्य मंदिर येथे सादर होणार

संगीत संयुक्त मानापमान नाटकाचे नाट्यरुपांतर रवींद्र नाट्य मंदिर येथे सादर होणार

*संगीत संयुक्त मानापमान नाटकाचे नाट्यरुपांतर रवींद्र नाट्य मंदिर येथे सादर होणार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संगीत संयुक्त मानापमान या नाटकाच्या प्रयोगास १०१ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या ऐतिहासिक प्रयोगाच्या इतिहासाचे नाट्यरुपांतर **संगीत संयुक्त मानापमान १०१* या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक ७ जुलै, २०२३ सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आलेले आहे.

संगीत संयुक्त मानापमान १०१ हा विशेष कार्यक्रम एका ऐतिहासिक घटनेचे नाट्यरुपांतर असून, त्यातून १०१ वर्षापूर्वी झालेला संगीत नाट्यपट रसिकांना अनुभवता येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दिनांक ८ जुलै १९२१ रोजी संगीत संयुक्त मानापमान या संगीत नाटकाचा मुंबईत नाट्यप्रयोग सादर झाला होता. संगीत संयुक्त मानापमान या संगीत नाटकाचा प्रयोग इतिहासातील एक अविस्मरणीय नाट्यप्रयोग होता. महात्मा गांधीनी स्वातंत्र्य चळवळीचा एक भाग म्हणून देश कार्यासाठी टिळक स्वराज्य फंडची स्थापना केली होती. या फंडाच्या आर्थिक मदतीकरीता हा प्रयोग सादर करण्यात आला होता. गंधर्व नाटक मंडळीतील आघाडीचे नट बालगंधर्व व ललित कलादर्शचे प्रमुख आणि नट केशवराव भोसले या दोन कलावंतांनी एकत्र येऊन या फंडाच्या मदतीसाठी संगीत संयुक्त मानापमान या नाटकाचा प्रयोग सादर केला होता. या प्रयोगास प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.

संगीत संयुक्त मानापमान या ऐतिहासिक प्रयोगाच्या इतिहासाचे नाट्यरुपांतराचे लेखन अभिराम भडकमकर यांनी केले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन ह्षीकेश जोशी यांचे आहे. या नाटकात ज्येष्ठ गायक राहुल देशपांडे, आर्या आंबेकर, संपदा माने, अजिंक्य पोंक्षे आणि इतर कलाकारांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी व शिवाजी मंदिर, दादर येथे उपलब्ध होतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

संगीत संयुक्त मानापमान या ऐतिहासिक प्रयोगाच्या इतिहासाचे नाट्यरुपांतराच्या प्रयोगास जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

 

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा