सावंतवाडी :
केद्र सरकारच्या विविध खात्यातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी प्रलंबित असून त्यात प्रमुख मागणी म्हणजे जानेवारी २०१७ पासून पेन्शन रिव्हीजन झालेली नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर असोसिएशन गेल्या आठ वर्षापासून सरकारला विविध माध्यमाद्वारे प्रयत्न करत आहे. माञ शासन याबाबत उदासीन असून निवृत्तीधारकांच्या न्याय मागण्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहे. यासाठी जाॅईट फोरम आॅफ एमटीएनएल, बिस एनल व इतर सर्व केद्रीय आस्थापनेतून निवृत झालेले निवृत्तीधारकांच्या सर्व संघटनांनी एकञ येवून आपल्या मागण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला असून सुरवातीला तालुका स्तरावर, मग जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर व शेवटी नवी दिल्ली येथे २१आॅगस्ट ते २५ आॅगस्ट या कालावधीमध्ये जंतरमंतर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी येथे आज जेष्ठ पेन्शनर श्री अण्णा देसाई व सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर असोसिएशन, सिंधुदुर्गचे संघटनमंत्री अॅड नकुल पार्सेकर यांच्या नेतृत्वाखाली BSNL च्या कार्यालयासमोर भर पावसात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री अण्णा देसाई, अॅड. नकुल पार्सेकर, संचार निगम पेन्शनर वेलफेअर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री आर. एस् पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी सचिव श्री वामन गवस, दत्ताराम महाडेश्वर, रविंद्र घोगळे, सौ. एस्. व्ही. नंदीहळी, श्रीमती जगताप, एकनाथ आरोलकर, यशवंत कविटकर तसेच पोस्ट, रेल्वे, डिफेन्स, हवामान खाते आदी केंद्रीय आस्थापनेतून निवृत झालेले बहुसंख्य निवृत्तीधारक उपस्थित होते.