You are currently viewing कणकवलीत 16 फुटी सापडला अजगर

कणकवलीत 16 फुटी सापडला अजगर

 कणकवली पोलीस ठाण्यात होमगार्डची सेवा बजावणारे सुमित वारंग यांच्या अथक प्रयत्नांनी मिळाले १६ फुटी अजगराला जीवदान..!

कणकवली

तालुक्यातील आशिये गावात एका चाळीस ते पन्नास लोकांच्या झोपडपट्टीच्या बाजूला एक १६ लांबीचा अजगर निदर्शनास आला. काही कामानिमित्त कणकवली पोलीस ठाणे येथे होमगार्ड पदी कार्यरत असलेले सुमित वारंग यांनी त्या अजगराला अथक प्रयत्नांनी पकडले. त्यानंतर त्या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. कणकवली पोलिसांना नेहेमीच सहकार्य करणारे होमगार्ड सुमित वारंग यांच्यामुळे त्या झोपडपट्टीतील लोकांचा जीव वाचला हे कौतुकास्पद आहे. सुमित यांनी केलेल्या या धाडसाने त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र सुमित यांच्या प्रयत्नांनी पुढे होणारा मिठा अनर्थ टळला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा