कणकवली नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण
कणकवली
वृक्ष आपल्याला प्राणवायू देतात त्यामुळे वृक्षांची लागवड व संवर्धन होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात एक झाड लावून ते जगवावे वृक्षप्रेमींनी नागरिकांना वृक्षाचे महत्त्व वृक्षतोड रोखण्यासाठी जनजागृती करावी असे आवाहन डी.पी. तानवडे यांनी केले.
शासनाच्या वनमहोत्सव कार्यक्रमांतर्गत येथील नगरवाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वाचनलयाचे कार्यवाह हनीफ पीरखान, सहकार्यवाह डी. पी. तानवडे, कार्यकारिणी सदस्य वैयजंती करंदीकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गावडे यांच्यासह वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.