You are currently viewing पाडलोस-केणीवाड्यामध्ये दिवसाढवळ्या धाडसी चोरी

पाडलोस-केणीवाड्यामध्ये दिवसाढवळ्या धाडसी चोरी

बांदा

पाडलोस केणीवाडा येथील अविनाश मनोहर साळगावकर यांच्या राहत्या घरी सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान दिवसाढवळ्या चोरी झाली. घरात कोणीही नसल्याचा अंदाज घेत चोरट्याने मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व 15 हजार रुपये लंपास केल्याचे उघड झाले.

सोमवारी पाडलोस केणीवाडा येथील अविनाश सागावकर हे नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता कामास निघाले. त्यानंतर पावणेदहा वाजता त्यांची पत्नी अश्विनी साळगावकर अंगणवाडी मध्ये गेली. सौ. साळगावकर या दुपारी दोन वाजता घरी आले असता त्यांना मागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरातल्या सर्वत्र पाहणी केली असता चोरी झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याची खबर त्यांनी पोलीस पाटील रश्मी माधव यांना दिली व पोलिसांना कळवले.
घरात कोणी नसल्याचे पाहत मागील दरवाजाची कडी तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. कपाटाच्यावर असलेली चावी घेत कपाट उघडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त टाकले. एका कप्प्यात सापडलेले पंधरा हजार रुपये घेऊन चोरट्याने पोबारा केला केला.
बांदा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले व पंचनामा केला. अधिक तपास बांदा पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा