You are currently viewing भटवारी जि. प. शाळा नं.6 मध्ये मुलांना गणवेश वाटप

भटवारी जि. प. शाळा नं.6 मध्ये मुलांना गणवेश वाटप

मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलांना गणवेश वाटप

सावंतवाडी

कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय जि. प. शाळा नं 6 भटवाडी सावंतवाडी या शाळेमध्ये सर्व शिक्षा अभियानामार्फत मुलांना मा.नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी मा.नगरसेविका दिपाली भालेकर म्हणाल्या की, मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या व शाळेचे नाव मोठे करा व आपलं भवितव्य उज्वल करा व मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


यावेळी शाळेच्या अध्यक्षा श्रीम अनिशा राणे, शिक्षणतज्ञ दिलीप भालेकर, शाळेचा मुख्याध्यापिका का. सायली लांबर, सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. सायली लांबर यांनी तर आभार सहाय्यक शिक्षिका सावंत मॅडम यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 7 =