विनयशील राहून जबाबदारी पार पाडण्याचे अच्युत भोसले यांचे आवाहन.
सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थी पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध गटातील विद्यार्थी प्रतिनिधींना मान्यवरांच्या हस्ते पदे सोपविण्यात आली._
_कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सदस्या सानिका देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, डी.फार्मसी प्राचार्य सत्यजित साठे, मुख्याध्यापक व्यंकटेश बक्षी उपस्थित होते._
_प्राथमिक गटात विद्यार्थी प्रतिनिधी प्रमुख म्हणून प्रज्योत पुराणिक, विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रमुख म्हणून आराध्या शर्मा तर माध्यमिक गटात विद्यार्थी प्रतिनिधी प्रमुख म्हणून गुरु होडावडेकर व विद्यार्थिनी प्रतिनिधी प्रमुख म्हणून लारा डिसोझा यांनी पदग्रहण केले. इतर विद्यार्थी प्रतिनिधी पदेही यावेळी स्वीकारण्यात आली. प्रत्येक हाऊस कॅप्टनला मान्यवरांच्या हस्ते बॅच व सॅशे प्रदान करण्यात आला._
_अच्युत भोसले यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी स्वीकारलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली व प्रत्येक विद्यार्थ्याने पदावर असताना विनयशील राहून कार्य करावे असे आवाहन केले._
_कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता खानोलकर व दीपिका कदम तर आभार प्रदर्शन वीणा कुडव यांनी केले._