You are currently viewing पळसंब येथे कृषी दिनी वृक्षारोपण कार्यक्रम!

पळसंब येथे कृषी दिनी वृक्षारोपण कार्यक्रम!

जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचा उपक्रम

मालवण

जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंब यांच्या वतीने कृषी दिनाच्या निमित्ताने जयंतीदेवी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. विद्याधर तायशेट्ये, स्टेट बँक ऑफ इंडियाचे निवृत्त श्री व्हि के सावंत, आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली चे अध्यक्ष श्री रवि परब उपस्थित होते. तसेच गावातील अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. व्हि. के. सावंत म्हणाले, आपल्या या जमिनी वडिलोपार्जित संपत्ती नसुन ख-या अर्थाने या जमिनी म्हणजे भावी पिढीचे भविष्य आहे.

डॉ.तायशेटे यांनी आरोग्याच्या काही समस्या असोत किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या समस्या असोत त्यांसाठी लागणारे सर्वतोपरी प्रयत्न आपण पळसंब गावांसाठी करणार असे यावेळी सांगितले. रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री रवि परब यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून गावातील सर्व समस्यां सोडविण्यासाठी कायमच कटिबद्ध असल्याचा शब्द पळसंब गावाला दिला. यावेळी जि प शाळा पळसंब नं १ चे मुख्याध्यापक श्री विनोद कदम, श्री गाड गुरूजी, तसेच श्री अण्णा कापडी, उपसरपंच श्री अविराज परब, अशोक जुवेकर, श्री जयंती देवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी श्री .गिरिधर पुजारे, अध्यक्ष श्री .उल्हास सावंत, उपाध्यक्ष श्री . अमरेश पुजारे, सचिव श्री चंद्रकांत गोलतकर, श्री .अमित पुजारे, खजिनदार श्री .वैभव परब, हितेश सावंत, शेखर पुजारे, बबन पुजारे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविकांत सावंत, उपाध्यक्ष रमेश मुणगेकर, देवस्थान मानकरी प्रमोद सावंत, रुपेश पुजारे, मेघशाम जुवेकर, आप्पा पुजारे, प्रसाद पुजारे उपस्थित होते. तसेच ज्या दात्यानी विनामुल्ये झाडे दिली त्यांचे आभार मानण्यात आले.
श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष रमेश परब, उपाध्यक्ष मधुकर कदम, सचिव योगेश कापडी,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा