इचलकरंजी : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या वाटचालीत देशातील दलित, आदिवासी, महिला या वंचित घटकांच्या हक्कासाठी प्रयत्न करून त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून न्याय देण्यात आला तर ९ वर्षांच्या काळात महिला सशक्तीकरण, प्रशासन, गरिबाचे कल्याण, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, दहशतवाद्यांवर नियंत्रणही आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. आ. सुरेश हाळवणकर यांनी दिली. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या 9 वर्षांच्या विकास कामांची माहिती देण्यासाठी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्री. हाळवणकर पुढे म्हणाले , पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आपल्या सत्ताकाळात गरीबांसाठी अनेक उपयुक्त योजना राबविल्या आहेत. त्यांनी जनतेची सेवा करण्यावर आणि सशक्तीकरणावर अधिक भर दिला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या वर्गाला 10 टक्के आरक्षण दिले केंद्र सरकारने गरीबांसाठी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत 3.5 कोटी पक्की घरे बांधून दिली तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत 11.72 कोटी शौचालयेही बांधली. स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 12 कोटी घराना नळाची जोडणी दिली. महिलांच्यासाठी धुरमुक्त स्वयंपाक घरे असावीत यासाठी उज्वला गैस योजने अंतर्गत 9.6 कोटी घरात गॅस जोडणी केली, महिला लाभार्थ्यांना 27 कोटीहून अधिक मूल्याचे मुद्रा कर्ज देण्यात आले. 60 कोटींहून अधिक लोकांना मोफत वैद्यकीय उपचार दिले आहेत. गेल्या 9 वर्षात एम्स ची संख्या 8 वरून 23 वर व्हेण्यात आली आहे. आयुष्यमान भारत योजना अंतर्गत 5 लाख रुपये खर्चाच्या आरोग्यसेवा मोफत दिल्या जात आहेत.
80 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य रेशन दुकाना मार्फत दिले त्यामुळे कोरोना काळात मोठा दिलासा मिळाला. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने अंतर्गत 137 कोटी युवकांना रोजगार प्रशिक्षण देण्यात आले. आणि वित्त पुरवठा करण्यात आला प्रधानमंत्री किसान योजने अंतर्गत देशातील 11 कोटी शेतकन्यांना दरवर्षी ६ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात येत आहे. पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत 1.30 कोटी रुपयांची विम्याचे दावे निकाल काढण्यात आले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य देत 3.54 लाख किमी ग्रामीण रस्त्यांची बांधणी करण्यात आली आहे महामार्ग बांधणीचा वेग दुप्पट झाला आहे. 53 हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्यात आले आहेत. सरकारच्या निती मुळे संपूर्ण जगात देशाचा मान वाढला आहे. देशाची एकूण निर्यात 750 अब्ज डॉलर्सहून अधिक
झाली आहे. भारताला जी-20 समूहाची अध्यक्षता मिळाली आहे. ही देशासाठी गौरवाची बाब आहे. कोविड महामारीच्या काळात व्हॅक्सिन मैत्रीच्या माध्यमातून जगातील 100 हून अधिक देशामध्ये मदत पाठवली आयोध्येत भव्य राम मंदिराची
उभारणी करून सांस्कृतिक आध्यात्मिक वारसा स्थळांच्या पुनर्निर्मितीतून देशवासियांच्या बद्धचा सन्मान केला जात आहे हातकणंगले लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या सहकार्याने रुकडी येथे रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात आले तर रुकड़ी जवळ पंचगंगा नदीवरही पुल बांधण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर इचलकरंजी अंतर 10 किमी ने कमी होण्यास मदत होईल. केंद्र सरकारच्या घरोघरी गॅस योजनेच्या माध्यमातून GTPIL कंपनीच्या माध्यामतून गॅस जोडणी सुरु करण्यात आली आहे. आजअखेर 700 कुटुंबांना गॅस पुरवठा सुरु झाला आहे. मजले येथे ड्रायपोर्ट उभाण्यास केंद्राची तत्वतः मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शेतीचा माल निर्यातीस मदत होणार आहे. तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधीच्या माध्यमातून 33 कोटी 75 लाख रुपयांची रस्त्यांची व पुलाच्या बांधकामाची कामे जागतिक बैंक ADB योजनेतून 205 कोटी 89 ताख रूपये राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे विभागाच्या माध्यमांतून 51 कोटी 56 लाख रुपयेचे रेल्वेची कामे, केंद्रीय जल जीवन मिशन योजनेतून तालुक्यामध्ये 569 कोटी 53 लाख रुपये, इचलकरंजी शहर व विविध गावामध्ये 730 कोटी 37 लाख रूपयांची नळ पाणीपुरवठाची कामे पंतप्रधान वैद्यकीय सहायता निधीतून 1 कोटी 72 लाख रुपयांची वैद्यकीय उपचार प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 56 कोटी 82 लाख तर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHI) मधून 6541 कोटी 45 लाख रुपये असे 7,772 कोटी 56 लाख रुपयांचा भरीव निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून हातकणगले लोकसभा मतदासंघातील अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. तर काही कामे प्रगती पथावर आहेत. हातकणंगले लोकसभा मतदासंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा
प्रतिबद्ध आहे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुशासनाला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इचलकरंजी भारतीय जनता पार्टी तर्फे महा जनसंपर्क अभियान राबवण्यात आले. त्याअंतर्गत केंद्रीय विमान उड्डाण मंत्री, राजे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबरोबर व्यापाऱ्यांचा परिसंवाद / व्यापारी मेळावा, डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा सर्व बुद्धिजीवीचा मेळावा, सोशल मीडिया प्रमुखांचा मेळावा ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा 350 कार्यकत्यांच्या सोबत वरद विनायक मंदिर जवळ पंचगंगा नदीघाट येथे टिफिन पे चर्चा, भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोर्चा आघाडीचा मेळावा असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच घर चलो अभियान अंतर्गत इचलकरंजीच्या 60 हजार घरामध्ये 9 वर्षातील मोदीजीनी केलेल्या कामाचं पॉम्पलेट देण्यात आले, असेही ते म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेस माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपा इचलकरंजी शहर अध्यक्ष अनिल डाळ्या ,माजी नगरसेवक किसन शिंदे ,मनोज साळुंखे ,मनोज हिंगमिरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.