वेंगुर्ले
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परुळे गवाण वेंगुर्ले ची इमारत ना दुरुस्त असल्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतो. सगळीकडे पावसामुळे गळती चालू असल्यामुळे मुले शाळेत बसू शकत नाहीत. ही बाब माजी सभापती निलेश सामंत, युवा उद्योजक प्रसाद पाटकर यांना समजताच त्यानी शाळेसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिली. यावेळी प्रसाद पाटकर, सुनील चव्हाण, श्रीपाद सावंत, मुख्याध्यापिका अंजली घोलेकर, शा. व्य. अध्यक्ष उर्मिला लांबर यासह पालक उपस्थित होते.