बांदा
बांदा येथील गडगेवाडी, निमजगावाडी व गवळीटेंब याठीकाणी CCTV व भोंगे बसवण्याच्या मागणीकरीता बांदा भाजपा शहर अध्यक्ष श्री.नरसिंह काणेकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्य व नागरीकांसह बांदा पोलिस ठाण्याला भेट देण्यात आली. सदर तिन्ही ठीकाणे ही बांदा-कोल्हापुर या महत्वाच्या मार्गावर असल्याने व अलिकडील काही महिन्यात चोऱ्यांचे प्रमाण सतत वाढलेले असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर ठिकाणी CCTV कॅमेरे व ध्वनिक्षेपक असणे हे महत्त्वाचे आहे हे माननीय सहा.पोलीस निरीक्षक श्री शामराव काळे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले व लवकरात लवकर या तिन्ही ठिकाणी सीसीटीव्ही व ध्वनिक्षेपक बसवण्याबाबत निवेदनही सादर करण्यात आले. यावेळी बांदा भाजपा शहराध्यक्ष श्री नरसिंह काणेकर यांच्यासोबत वार्ड क्रमांक तीन मधील सदस्य श्री प्रशांत बांदेकर, तनुजा वराडकर, गुरु कल्याणकर व सामाजिक कार्यकर्ते हेमंत दाभोळकर आदी उपस्थित होते.