कणकवली
इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा दिगवळे नंबर एक प्रशालेतील इयत्ता दुसरीमधील कुमार प्रज्वल प्रसाद मसुरकर याने दुसऱ्या फेरीत राज्य गुणवत्ता यादीत नववा क्रमांक प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.
डिसेंबर २२ ते फेब्रुवारी २३ मध्ये दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धा परीक्षेतील गणित विषयात उल्लेखनीय यश संपादन करून राज्य गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकावून२२/२३ या वर्षातील शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे. प्रज्वल याच्या या सुवर्णमय यशानिमित इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडचे चेअरमन एम. मधुमत्ती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारताच्या धावपटू आणि ऑलिंपियन चॅम्पियन पी. टी. उषा यांच्या मार्फत स्कॉलरशिप चेक, प्रेझेंटेशन लेटर, मेरिट सर्टिफिकेट, ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट,गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रज्वल याच्या उल्लेखनीय यशानिमित जि.प. प्राथमिक शाळा दिगवळे प्रशालेतील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक मेस्त्री आणि सर्व सदस्य, नरडवे केंद्र प्रमुख विजय भोगले ,प्रशाला मुख्याध्यापक सुनिल गावकर , पदवीधर शिक्षक के. पी. सावंत यांनी प्रशालेच्या वतीने सत्कार केला. कु.प्रज्वल यास प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका आराधना रासम, उपशिक्षिका प्रांजली मसुरकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कनेडी हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक प्रसाद मसुरकर यांचा चिरंजीव प्रज्वल असून त्याच्या उल्लेखनीय यशानिमित विद्यार्थी आणि ग्रामस्थांमार्फत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.