कणकवली, देवगड व वैभववाडी या तीन तालुक्यांची आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा
कणकवली
आता आपत्ती व्यवस्थापन बैठकीत केलेल्या सूचनाचे तंतोतंत पालन केल्यास कोणताही अडथळा येणार नाही.आपण लोकांचे बांधील आहोत,तुम्हाला मदत लागल्यास मला कळवा,मी तातडीने उपाययोजना करुन देईन,सरकारची मदत लागत असेल मी तयार आहे.कम्युनिकेशन करा,तरच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल.आता सत्तेत आहोत.सगळ्यांनी सोबत राहून काम केले पाहिजे.आपण सगळेच जनतेचे सेवक आहोत,हे लक्षात ठेवा.श्री. कातकर यांनी वॉट्सॲप ग्रुप करावा,त्यावर चर्चा करावी.आता पाऊस होताच गणपती उत्सव येईल,तक्रारी होता गामा नये, अशा सूचना आ.नितेश राणे यांनी या बैठकीत दिल्या.
कणकवली तहसीलदार कार्यालय येथे कणकवली, देवगड व वैभववाडी या तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार,वैभववाडी तहसिलदार दीप्ती देसाई ,देवगड तहसीलदार करिश्मा नायर ,तालुका आरोग्य अधिकारी श्रीमती इंगवले,वीज वितरण कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते,पोलीस निरीक्षक अनिल जाधव,गटविकास अधिकारी अरुण चव्हाण,कणकवली मुख्याधिकारी अवधूत तावडे,कृषीअधिकारी वैशाली मुळे ,सार्वजनिक बांधकाम उपअभियंता श्रीमती प्रभू,महामार्ग प्राधिकरण उपअभियंता श्री.शिवणीवार नीआदींसह तीन तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कणकवली मतदार संघातील जनतेला अतिवृष्टी व आपत्ती कालावधीत कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये.त्यादृष्टीने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे. पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार सुरुवात केली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होणार अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार जोरदार पाऊस व वादळी वारे यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये ,त्यादृष्टीने सर्वांनी सेवा द्यावी.वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा सरकारकडे समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी थेट मला संपर्क अधिकाऱ्यानी साधावा,अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या.
पाऊस सुरु उशिरा झाला आहे तरी देखील झाडे पडून रस्ता बंद,वीज लाईंनवर झाडे पडून लाईट कायम ये- जा होत असते.लोकांच्या तक्रारी होत आहेत.वीज अधिकाऱ्यांनी त्याची काळजी घ्यावी असे नितेश यांनी सांगितले.त्यावर श्री.मोहिते यांनी झाडांच्या फांद्या वेळेत तोडून नियोजन केले आहे, बऱ्याच प्रमाणात झाडी कटिंग झाली आहे.आमच्या उपाययोजना चालू आहेत.एखाद्या गावात लाईट गेली समजल्यानंतर फॉल्ट सापडेपर्यंत वेळ जातो.कमी काळात तातडीने उपाययोजना केली जाईल,असे सांगितले.
त्यानंतर आ.नितेश राणे यांनी शहरे आहेत तिथे विशेषतः वैभववाडी आणि कणकवली मध्ये लोकांना गटार मधील पाण्याचा त्रास होऊ नये,यासाठी साफसफाई करणे आवश्यक आहे.भुईबावडा आणि फोंडा घाट सुरळीत केली आहे.आरोग्य विभागाने काळजी घेऊन सेवा द्यायला पाहिजे,दवाखान्यात आलेल्या रुग्णांना सेवा द्यावी, अशा सूचना दिल्या.
कणकवलीत धबधबे हायवेवर होतात.काय केलात केव्हा होणार काम? आठवड्यानतर काम चालणार नाही.लोकांना करणे देऊन चालणार नाही.कामे वेळेतच केली नाही.तर आम्ही काय उत्तरे देणार?लोकांना आम्ही कारणे देवून चालत नाही.लवकरात लवकर करुन द्या,दोन दिवसांत तर दोन दिवसांत करून द्या,अशी कानउघडणी महामार्ग कार्यकारी अभियंता श्री.जाधव यांची आ.राणे यांनी केली.
या बैठकीत कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी सर्व विभागांना आपत्ती कालावधीत झाडे रस्त्यावर पडल्यास वाहतूक सुरळीत करावी,पूरस्थिती निर्माण झाल्यास लोकांना स्थलांतरित करावे,पावसाचे पाणी रस्त्यावर येवू नये यासाठी नाले सफाई करावी,रस्त्यावर झाडे पडल्यास ती बाजूला करावीत.वाहतूक खो खोळंबली तर तात्काळ पथके पाठवावीत.महामार्गावर धोकादायक ठिकाणी निश्चित करुन उपाययोजना कराव्यात.पुलावरून पाणी जात असेल तर त्या ठिकाणी बोर्ड लवावेत.गावच्या लोकांना सूचना कराव्यात.फोंडा व गगनबावडा या घाट मार्गावर घाट कोसळल्यास पथके तयार ठेवावीत.आरोग्य विभागाने साथीचे आजार पसरु नयेत,त्यासाठी नियोजन करावे.कोकण रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याच्या ठिकानाची यादी देण्याच्या सूचना केल्या होत्या.महावितरण कडून मान्सून पूर्व झाडे कटिंग बाबत आणि वीज पुरवठा खंडित झाल्यास तातडीने उपाययोजना करण्याच्या सतर्क राहावे,कृषी विभाग कडून नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत.एसटी विभागाने पर्यायी मार्गाने वाहतूक केल्यास माहिती लोकांना द्यावी, पूरस्थितीनिर्माण झाल्यास योग्य नियोजन करावे,आपत्तीच्या काळात कार्यालयीन वेळेनंतर फोन चालू ठेवावेत.आपत्ती काळात मुख्यालयात रहावे,तुमच्या अडचणी असल्यास सर्वांनी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे.नैसर्गिक आपत्तीत चुका केल्यास कारवाई केली जाईल,असा इशारा दिला आहे.
महामार्ग उपअभियंता श्री.शिवणीवार आमदारांनी धरले धारेवर..
गगनबावडा घाट मार्गावर समस्या असल्याचे नाशिर काझी यांनी सभेत लक्ष वेधले.त्यावर निविदा कामांची झाली आहे.तरीही दोन्ही बाजूचे गटार सफसपाई झाले असल्याचे श्री.शिवणीवार यांनी सांगितले.मात्र,आ.नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त करत चुकीची उत्तरे देवू नका.जनतेला तोंड आम्हाला द्यायला लागते.तुम्ही वरिष्ठांशी बोला तातडीने काम चालू करा.आपत्ती काळात गैरसोय होऊ नये.आम्ही लोकांशी बांधील आहोत.