सावंतवाडी
येथील कुटीर रुग्णालयाच्या रक्तपेढी तज्ञपदी सुप्रिया सातोसकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. उद्यापासून त्या ठिकाणी काम पाहणार आहेत. याबाबत रक्तदाता संघटने कडून पद भरतीसाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पुढील आदेश होईपर्यंत त्यांना सावंतवाडी रक्त पेढीत काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.