जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल,कोल्हापूर यांचे आयोजन
सावंतवाडी
जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान व अथायु मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यामाने रविवार दिनांक 25 जून रोजी आरोग्य शिबीर माठेवाडा श्री स्वामी समर्थ कॉम्प्लेक्स येथे भरवण्यात आले. या महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ह्या महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या हस्ते करण्यात आला . शुभारंभाच्या प्रसंगी अथायु मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल येथील डॉक्टर मुळीक, मार्केटिंगचे मॅनेजर मदन गोरे ,वर्षा कानेटकर, तसेच तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पडते, सुनील कोरगावकर ,स्नेहदीप हॉटेलचे मालक मनोहर जगताप गवळी ,सामाजिक कार्यकर्ते सुनील केळुसकर, विठ्ठल मंदिरातील पुजारी प्रमोद भागवत आदी या महाआरोग्य शिबिराला उपस्थित होते. यावेळी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी आपल्या भाषणामध्ये महात्मा फुले जीवनदायी जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया, तसेच जेवण व औषधांचा ,महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत रुग्णांना लाभ घेता येतो. तसेच रुग्णांना रुग्णालयामार्फत सावंतवाडी व विविध जिल्ह्यातील ,तालुक्यातील रुग्णांना बस सेवा कोल्हापूर येथे जाण्यासाठी रुग्णालया मार्फत उपलब्ध आहे . याचा लाभ रुग्णांनी घेतला आहे. सावंतवाडी येथील महाआरोग्य शिबिराला जिल्ह्यातील 132 रुग्णांनी लाभ घेतला . त्यामध्ये ७२ रुग्णांची विविध आजारांवर शस्त्रक्रिया होणार आहे