You are currently viewing ओटवणे येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ओटवणे येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ओटवणे प्रतिनिधी

गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओटवणे शाळा नं २ येथे घेण्यात आलेल्या या शिबिराचा मांडवफातरवाडीतील
२७५ आबालवृद्धांनी लाभ घेतला. या शिबिरात रूग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी
डॉ भार्गव भिडे, डॉ राहुल घुसे, डॉ अखिलेश शुक्ला, डॉ बी जी रेस्मी, डॉ ललिता गावकर, सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनायक दळवी, सचिव संतोष राणे, मुंबई येथील उद्योजक सुरेश तावडे, ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाराम वर्णेकर, उद्योजक रविंद्र कुडाळकर, सामाजिक युवा कार्यकर्ते उमेश गावकर, संकल्प सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी विनायक दळवी यांनी
संपूर्ण जगात आयुर्वेदिक उपचार चिरकाल टिकणारे असुन हे उपचार म्हणजे एक देणगीच आहे. कारण आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनांपासूनच या औषधांची निर्मिती केली जाते. या आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचारासह आजार होऊच नये यासाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद सल्याचे सांगितले. डॉ भार्गव भिडे यांनी आयुर्वेद ही चिकित्सा नाही तर ती जीवन जगण्याची शैली आहे. गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान हे आयुर्वेदिक क्षेत्रातले चांगले संस्थान आहे. या ठिकाणी रुग्ण बरे करण्यासह ते रोगी होऊच नये यासाठी काम केले जाते. त्यामुळे आयुर्वेदाच्या परिपूर्ण चिकित्सा व उपचारासाठी या संस्थानच्या हॉस्पिटलमधील सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन केले. यावेळी रवींद्र कुडाळकर, राजाराम वर्णेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रज्जल याने केले.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या अधिष्ठाता डॉ सुजाता कदम, मेडिकल कॅम्प इन्चार्ज डॉ प्रशांत ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात
डॉ भार्गव भिडे, डॉ राहुल घुसे, डॉ अखिलेश शुक्ला, डॉ बी जी रेस्मी, डॉ ललिता गावकर यानी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात हृदयरोग, उच्च रक्तदाब, ऍलर्जी व दमा श्वसन विकार, त्वचाविकार, लिव्हर व किडनी विकार, हाडाचे व सांध्याचे आजार, पक्षाघात, वातविकार, मधुमेह, मुळव्याध, थायरॉईड, बालरोग, स्त्रीरोग व अन्य जुनाट विकार असलेल्या रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. तसेच या शिबिरात काही रुग्णांची मधुमेह तपासणी करून उपचार करण्यात आले.
यावेळी गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या मेडिकल कॅम्प विभागाच्या कर्मचारी वर्गाचेही सहकार्य लाभले. या शिबिराचे संकल्प सेवा संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. यावेळी रुग्णांनी वाडीमध्ये मोफत आयुर्वेद
आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिर घेतल्याबद्दल गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, ओटवणे मांडवफातरवाडी येथील संकल्प सेवा संघ तसेच सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट असोसिएशनचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा