You are currently viewing कणकवली बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलला ज्युनिअर कॉलेजची मान्यता

कणकवली बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूलला ज्युनिअर कॉलेजची मान्यता

कणकवली :

 

अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल कणकवलीला ज्युनिअर कॉलेजची मान्यता मिळाली असून, कॉलेजसाठी इयत्ता ११ आणि १२ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलने गेली कित्येक वर्ष कणकवली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये संस्कारशील आणि गुणवान विद्यार्थी घडविले आहेत. अनिरुद्ध शिक्षण प्रसारक सऺस्थेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. JEE ,NEET सोबतच परदेशी भाषा शिक्षण आणि लष्करी प्रशिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थी हा योद्ध्या घडावा म्हणून ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांवर मेहनत घेण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आता ज्युनिअर कॉलेजची मान्यता मिळाल्यामुळे, स्कूलचे नाव बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज असे होणार असल्याची माहीती शाळेच्या संचालिका सौ. सुलेखा रमेश राणे मॅडम यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी 7841838196, 9168340403, 9820725989, 9404940217 नंबरवर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा