*व्ही.एन. नाबरची माजी विद्यार्थिनी तन्वी बांदेकर JEE Advance जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल सत्कार*
दर्जेदार इंग्रजी शिक्षण तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पूरक वातावरण
अशा विविध वैशिष्ट्यांसाठी व्ही . एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल नावाजलेली आहे.याच प्रशालेतून दहावीत शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेली कुमारी तन्वी बांदेकर ही जेईई ऍडव्हान्स परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आल्याबद्दल प्रशालेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला.
कु. तन्वी बांदेकर हिने इंजिनियरिंग क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित व कठीण समजली जाणारी परीक्षा नुसती पास न होता तन्वी जिल्ह्यात प्रथम व देशात १५७३ वा क्रमांक प्राप्त करून जी कामगिरी केली आहे .याच सोनेरी क्षणाचं औचित्य साधून प्रशालेतील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शाळेत एक आागळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला.
इतर विद्यार्थांना आपला अनुभव कथन करताना तन्वी आपल्या यशाचं श्रेय शाळेलाच देते.
हा उपक्रम मुलाखत पद्धतीने घेतला गेला.यात विद्यार्थ्यांनी तिला विविध प्रश्न विचारले त्यांच्या शंकांच़े निरसन करताना तन्वी म्हणाली की, आपला अभ्यास प्रामाणिकपणाने केला पाहिजे .अभ्यास करत असताना लक्ष हा फक्त अभ्यासावरच असावा हे सांगत असताना वेळेच्या वेळी अभ्यास केला की परीक्षेच्या वेळी खूप अभ्यास करावा लागत नाही.दहावीच्या विद्यार्थ्यांना तिने सांगितले आहे की पहिल्या दिवसापासून अभ्यास करा म्हणजे एक्झाम च्या अगोदर गडबड होणार नाही . कन्सिस्टन्सी म्हणजे काय हे सांगून कन्सिस्टन्सी ही शालेय जीवनात कशी महत्त्वाची हेही तन्वीने विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या अनुभवातून स्पष्ट करून सांगितले. ती पुढे म्हणाली की, यशाची शिखरं गाठत असताना वेळोवेळी आपल्याला शिक्षकांचा वाटा हा मोलाचा असतो.शिक्षकांचा हा आदर्श पुठयात ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करा आपल्या यशाच्या गमक सांगताना तन्वीने मुलांना सांगितलं की वेळेची बचत आणि अभ्यास हेच सूत्र लक्षात ठेवा.
यावेळी प्रशालेच्या मुख्यध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी शाळेच्या वतीने तिचा सत्कार केला. त्यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तिचे पालक श्री. प्रशांत बांदेकर व सर्व विद्यार्थी तिथे उपस्थित होते.