मिनी बस सुमारे ५० फूट खाली कोसळून भीषण अपघात
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

मिनी बस सुमारे ५० फूट खाली कोसळून भीषण अपघात

५ जण जागीच ठार

उंब्रज

दिवाळीची धामधूम सुरु असताना आशियाई महामार्गावर उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या पुलावरुन मिनी बस सुमारे ५० फूट खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मिनी बस वाशीवरुन गोव्याकडे निघाली होती. अपघातात तीन पुरुष एक महिला व तीन वर्षाचा मुलगा असे पाच जण ठार झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार उंब्रज ता.कराड येथील तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनी बस सुमारे ५० फूट खाली कोसळली.

यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना कळाला. त्यानंतर नागरिक पोलिसांनी येथे धाव घेवून मदत कार्य सुरू केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा