You are currently viewing कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मान. श्री.संजय भावे यांची फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राला सदिच्छा भेट

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मान. श्री.संजय भावे यांची फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राला सदिच्छा भेट

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मान. श्री.संजय भावे यांची फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राला सदिच्छा भेट

सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी केले स्वागत

फोंडाघाट

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु मान. श्री.संजय भावे यांनी फोंडाघाट कृषी संशोधन केंद्राला सदिच्छा भेट दिली. फोडाघाट मधील शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय आग्रे, राजु पटेल, सरपंच सौ.संजना आग्रे, अजित नाडकर्णी , विश्वनाथ राधव राजन नानचे यांनी संजय भावे यांची भेट घेतली. कुलगुरुंनी अजित नाडकर्णी यांचे स्व.भाऊ हेमंत नाडकर्णी आणि कुटुंबीयाची आस्थेने चौकशी केली. नाडकर्णी कुटुंबीयांचे व कुलगुरू संजय भावे यांचे ऋणानुबंध आहेत. सिंधुदुर्गातील कोकण कृषी विद्यापीठाचा कुलगुरु हे भुषणावह पद असूनही त्यांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली.


या ठिकाणचे कृषी विद्यवेत्ता श्री.शेटये सरांचीही कुलगुरु आणि सर्व फोंडावासीयांनी स्तुती केली. फोंडाघाट कृषी संशोधन केंद्रावर लक्ष ठेवुन या ठिकाणी काय आणायचं आणि रोजगार कसा वाढवायच्या यावर भर देणार असल्याचे यावेळी कुलगुरूंनी सांगितले सांगीतले. त्यांच्या पत्नी आणि मुलाचीही अजित नाडकर्णी यांनी सत्कार सत्कार केला तसेच पुढच्या वेळी वेळ काढुन येण्याचे निमंत्रणही सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी कुलगुरू संजय भावे यांना दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा