You are currently viewing आमदार नितेशजींचा आज वाढदिवस..

आमदार नितेशजींचा आज वाढदिवस..

 

महाराष्ट्रातील तमाम युवकांचे प्रेरणास्थान असलेले हे लाडके व्यक्तिमत्त्व. “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात” हि म्हण सत्य ठरवणाऱ्या हया युवा नेत्याने अत्यंत लहान वयात अख्खा महाराष्ट्र पादाक्रांत केला व तरुणाईचा श्वास बनला. कोकणातल्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या तरुणाईच्या आणि तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत असलेला हा तरुण आमदार, ज्याला फार मोठी राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे.

आदरणीय मोठ्या साहेबांकडून आक्रमकपणा व अभ्यासु वृत्ती हा वारसा लाभलेल्या नितेशजी नी सर्वसामान्य जनतेच्या हृदयाच्या आतल्या कप्प्यात अढळ स्थान निर्माण केले. विद्यार्थीदशेत असतानाच नितेशजी नी महाराष्ट्र स्वाभिमान संघटना स्थापन करून महाराष्ट्रातील तरुणांना एकत्र केले,व अनेक जनहिताच्या प्रश्नासाठी हि युवा संघटना रस्त्यावर उतरून संघर्ष करु लागली. जनहिताची प्रत्येक आंदोलने नितेशजी नी उभी केली व जनतेच्या दरबारात स्वतःला सिद्द केलं. ह्या महाराष्ट्रात कोणतेही मोठे संकट येवो त्या, संकटाला सामोरं जाऊन चितपट करण्याची ताकद राणे कुटुंबियांकडे असुन त्यातला एक घटक नितेशजी आहेत. कोकणातील गंभीर पूरस्थिती, वादळ, कोरोना चे संकट, आरोग्याच्या साथी अशा कितीतरी आपत्कालीन परिस्थितीत हा तरुण आमदार जनतेचा तारणहार म्हणून खंबीर उभा असतो. आमदारकीच्या दुसऱ्याच टर्म मध्ये विधीमंडळाच्या केंद्रस्थानी असलेले, एक अभ्यासु नेतृत्व म्हणुन उभा महाराष्ट्र नितेशजी कडे पहातोय !

निधड्या छातीचा,दिलदार स्वभावाचा, गोरगरिबांचा कैवारी, तरूणाई च्या गळ्यातील ताईत असलेला, सर्वसामान्या मध्ये रमणारा, कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना प्राणापेक्षा जास्त जपणारा, वडीलधाऱ्याना मानसन्मान देणारा, कोणत्याही संकटाला लिलया सामोरा जाणारा, परिणामांची तमा न बाळगणारा, जनतेशी अत्यंत प्रामाणिक असणारा, विरोधकांनी कितीही टिका केली तरी स्वतःच्या मतांवर ठाम रहाणारा, एकावेळी अनेकांना अंगावर घेऊन चीतपट करणारा,जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा,कुणी कितीही टीका टिपण्णी केली तरी जनतेशी प्रामाणिक असणारा, जनतेसाठी तुरुंगवास भोगणारा! असे हे अष्टपैलू नेतृत्व… आज अख्खा महाराष्ट्र ह्या तरुण नेत्याकडे आशेने व अपेक्षेने पहात आहे.

दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व, नेतृत्व ह्याचा सुरेख संगम असलेला हा नेता म्हणजे कोकणची शान व महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. नितेशजी चा वाढदिवस म्हणजे तरुणाईचा उत्सव असतो…खरे तर नितेशजीं च्या कार्य कर्तृत्वा वर लिहायचे झाले तर रकाने च्या रकाने लिहावे लागतील !!!!

तरी आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी परमेश्वराने त्यांना दिर्घ आयुष्य उत्तम आरोग्य देऊन भविष्यातील उज्ज्वल महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी देवो हिच परमेश्वराकडे प्रार्थना 🙏🏻

शुभेछुक : संदिप कुडतरकर आणि कुटुंबीय

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा