*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ग्लास प्रितीचा ठेऊन उपडा*
ग्लास प्रितीचा ठेऊन उपडा
बसले प्रेमिक *खेळ पहात*
*छोटी छोटी* फुल पाखरे
शिरू पहात आहेत पेल्यात
भोळी बिचारी जरा विचारी
मौजेने बाहेर *नृत्य करती*
विसरून जाती ग्लासामधले
सुंदर जग आहे छोटे किती
आभासीचे भुलून भासाला
समजून जाती पृथ्वी कोंडली
देवाजीची *अद्भूत* करणी
छोट्या ग्लासी कशी पहुडली
*मोद होऊन* नाचती वेडी
भान न उरले *काळोखाचे*
तल्लीन झाली भोळी भाबडी
*विसरून* गेली घरी जायचे
बसून बाहेर गंमत अनुभवती
बिलगून *दोघे* एकमेकांना
क्षण मोदाचे पाहून न थकती
सोबत करती त्या पाखरांना
विनायक जोशी🥳 ठाणे
मीलनध्वनी/९३२४३२४१५७
३३१/गुरुवार/२२ जून २०२३