*सिंधुदुर्गात पुढची वर्षानुवर्षे श्रीधर नाईक हा विचार म्हणून जगला जाईल- खा. विनायक राऊत*
*कणकवलीत कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतिदिन साजरा*
*दहशतवादाची, गुंडगिरीची परंपरा उखडून काढा-ब्रिगे. सुधीर सावंत*
*श्रीधर नाईक यांना अभिप्रेत काम यापुढच्या काळातही करू- आ. वैभव नाईक*
सिंधुदुर्ग संस्कृती जपणारा आणि शांतताप्रिय जिल्हा आहे. बॅ. नाथ पै. प्रा. मधू दंडवते यांनी जिल्ह्यात एक विचार निर्माण केला. दुर्दैवाने या जिल्ह्याच्या संस्कृतीत एक विकृती निर्माण झाली. त्या विकृतीने परोपकारी वृत्तीचे सामाजिक कार्यकर्ते श्रीधरराव नाईक यांचा बळी घेतला. या विकृतीला संपवण्याचा निर्धार जिल्हा वासियांनी केला. श्रीधर नाईक यांची हत्या झाली असली तरी त्यांच्या विचारांना कोणीही मारू शकत नाही.सिंधुदुर्ग मध्ये पुढची वर्षानुवर्षे श्रीधर नाईक हा विचार म्हणून जगला जाईल. लोक या विचारांचे संवर्धन करतील. श्रीधर नाईक यांनी केलेली समाज सेवा गौरवास पात्र होती.त्यांच्या सामाजिक कार्याची परंपरा आ. वैभव नाईक,सुशांत नाईक जपत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्वानी एकत्र रित्या काम करूया आणि जिल्हयाचा सर्वांगीण विकास करूया असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.
कै. श्रीधरराव नाईक यांचा ३२ वा स्मृतीदिन आज कणकवलीतील श्रीधर नाईक चौक येथे साजरा करण्यात आला. खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीधर नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.अमर रहे अमर रहे श्रीधर नाईक अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. तद्नंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीर घेण्यात आले. ९२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. *विजयराव नाईक फार्मसी कॉलजने देखील या रक्तदान शिबिरात सहभाग घेत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.* याप्रसंगी महिला बचत गटाच्या महिलांचा सन्मान चिन्ह व छत्री देऊन सत्कार करण्यात आला. श्रीधर नाईक यांचे सहकारी निमणकर यांचा सत्कार करण्यात आला. कणकवली पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिकेत उचले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
*यावेळी माजी खा. ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले,* श्रीधर नाईक यांची हत्या झाली तेव्हा देशात दहशतवाद फोफावला होता. राजकीय पक्षाचे नेते मंडळी दहशत माजवत होते. श्रीधर नाईक यांच्या हत्येची चौकशी करून कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा केला. लोकसभेतही आवाज उठवला. दहशत वादाची गुंडगिरीची परंपरा सुरु आहे. हिला उखडून काढण्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. याप्रकारचे राजकारण बंद झाले पाहिजे. जे असुर याठिकाणी निर्माण झाले आहेत त्यांच्या विरोधात संघर्ष करण्याचे काम करणाऱ्या लोकांना मदत करण्याची भूमिका सर्वानी ठेवावी असे सांगितले.
*आमदार वैभव नाईक म्हणाले,* ३२ वर्षांपूर्वी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील तरुण वयात श्रीधर नाईक हजारो लोकांचे नेतृत्व करत होते. हे नेतृत्व केवळ राजकीय क्षेत्रात नव्हे तर क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी होती. समाजातील दुर्बल घटकांना सर्वोतपरी मदत कार्य करण्याचे त्यांनी काम केले. सामाजिक कार्यातून त्यांनी हजारो कार्यकर्ते घडविले. परोपकरी वृत्तीचे नेतृत्व आपल्याला जड जाईल म्हणून काहींनी त्यांची हत्या केली. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. स्मृतिदिनानिमित्त आज त्यांच्या विचारांवर प्रेम करणारे आपण सगळे लोक याठिकाणी जमला. त्याबद्दल नाईक कुटुंबियांच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो.श्रीधर नाईक यांना अभिप्रेत काम यापुढच्या काळातही आम्ही करू असे त्यांनी सांगितले.
*शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले*
सिंधुदुर्ग च्या जडणघडणीत नाईक कुटूंबियांचे महत्वपूर्ण योगदान आहे. श्रीधर नाईक यांनी जनतेमध्ये लढण्याची ताकद आणि तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता.त्यांचे विचार तळागाळात पोचले होते. त्यांची वाढती लोकप्रियता विरोधकांना अडचणीची वाटू लागल्याने श्रीधर नाईक यांचे नेतृत्व संपविण्यासाठी त्यांची निर्घृण हत्या झाली. त्या प्रवृत्तीला संपविण्यासाठी आपण लढा दिला पाहिजे.
*राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत म्हणाले,* एखाद्या व्यक्तीचा ३२ वर्षे स्मृतिदिन साजरा केला जातो यातच त्या व्यक्तीची लोकप्रियता त्यांनी केलेले काम याची जाणीव होते. श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन ३२ वर्षे साजरा केला जातो त्यांनी केलेल्या कामाची हि पोचपावती आहे. त्यांच्या समाजसेवेचा वारसा आ. वैभव नाईक, सुशांत नाईक जोपासत आहेत हे कौतुकास्पद आहे असे सांगितले.
*काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख म्हणाले,* युवकांना दिशा देण्याचे कार्य श्रीधर नाईक यांनी केले. मलाही त्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्यासारखा दुसरा नेता अद्याप झाला नाही आणि होणे शकय नाही.
*सुशांत नाईक म्हणाले,* श्रीधर नाईक यांचा स्मृतिदिन विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून गतवर्षी कणकवलीत श्रीधर नाईक उद्यान विकसित करून त्याचे उदघाटन करण्यात आले. श्रीधर नाईक यांच्या हत्येनंतर त्या प्रवृत्ती विरोधात मोठा संघर्ष झाला. त्या संघर्षाला २०१३ साली खा. विनायक राऊत व त्यानंतर आ.वैभव नाईक निवडून आल्याने यश मिळाले. मात्र कणकवली मतदारसंघात दहशतवाद, दडपशाही,हुकूमशाही अजूनही जिवंत आहे. सर्वानी एकत्र येऊन दहशतवाद संपविला पाहिजे. त्यासाठी ब्रिगे. सावंत त्यावेळी आमच्याबरोबर होते तसे यावेळीही देखील आमच्या बरोबर राहतील असा विश्वास व्यक्त केला. *यावेळी अरुण भोगले यांनीही श्रीधर नाईक यांच्या आठवणींना उजाळा दिला.*
याप्रसंगी माजी खा. ब्रिगे.सुधीर सावंत,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हाप्रमुख सतीश सावंत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, अतुल रावराणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,काँग्रेस कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, संग्राम प्रभुगांवकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,कुडाळ नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, सचिन सावंत, कन्हैया पारकर,मुरलीधर नाईक, संकेत नाईक, रुपेश नार्वेकर,अशोक करंबेळकर,डॉ पटेल,रामू विखाळे, हरी खोबरेकर,गणेश कुडाळकर,अनंत पिळणकर, भास्कर राणे,राजू राठोड, हर्षद गावडे, वैदेही गुडेकर,दिव्या साळगावकर,प्रतीक्षा साटम,राजू राणे, बाळू मेस्त्री,प्रसाद अंधारी,मंदार सावंत, विजय पारकर,बंडू ठाकूर,दादा कुडतरकर,अरुण भोगले,आबा दुखंडे,विजय कोदे,उत्तम लोके,रुपेश आमडोस्कर,योगेश मुंज ,निसार शेख,संजय पारकर, सचिन आचरेकर, धीरज मेस्त्री, नितेश भोगले,सचिन खोचरे,तेजस राणे,मिलिंद आईर आदींसह श्रीधर नाईक प्रेमी व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.