सावंतवाडी
या वर्षीपासून रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने यावर्षी पासून” सहृदय धन्वंतरी पुरस्कार” जाहीर करण्याचे ठरविले असून , या वर्षीचा पुरस्कार हृदय रोग तज्ञ डॉ अभिजित चितारी याना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण सोहळा डॉ. नवांगुळ हॉस्पिटलमध्ये आयोजीत करण्यात आला होता.
धन्वंतरी दिनाच्या निमित्ताने झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष रो डॉ. राजेश नवांगुळ, उपाध्यक्ष रो अनंत उचगावकर, सेक्रेटरी रो दत्तात्रय म्हापसेकर, रो वसंत करंदीकर आणि सावंतवाडी परिसरातही रुग्ण आणि यशराज हॉस्पिटल मधील स्टाफ उपस्थित होता. यावेळी ” जागतिक नुमोनिया दिवसाचे” औचित्य साधून डॉ अभिजित चितारी यांनी कोविड नुमोनिया आणि घ्यावयाची काळजी याबाबत जागरूकता आणि मार्गदर्शन केले.