केलीत योगासने, राणे कुटुंबियांनी ही घेतला सहभाग
कणकवली
भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे व भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कुटुंबासमवेत जागतिक योग दिन साजरा केला. विविध योगासने करून योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या समवेत सौ नीलम ताई राणे यांनीही या योग दिनात सहभाग घेतला होता.
जागतिक योग दिन भारतासह जगभर साजरा केला जात असताना प्रत्येक घटकाने या दिनाचे पावित्र्य राखले आहे. योगासने करून योग दिन साजरा केला आहे. भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे हे परदेशी दौऱ्यावर असताना त्या ठिकाणी योगासने करून योग दिन साजरा केला.
देशात प्रत्येक नागरिकांनी योग दिनाची बांधिलकी जोपासलेली आहे. प्राथमिक शाळेपासून सामाजिक संस्थांपर्यंत सर्वत्र ठिकाणी योगासने करून योग दिन साजरा केला जात आहे. त्याचप्रमाणे राणे कुटुंबियांनी सुद्धा परदेशी असताना सुद्धा देशभावनेशी एकरूप होऊन जागतिक योग दिनात आपला सहभाग नोंदविला आहे. निरोगी आयुष्यासाठी योगासने ही काळाची गरज आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.