सावंतवाडी
न्हावेली गावातील विजवाहिन्या वरील झाडी न तोडल्याने पावसाळ्यापूर्वी वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे या विषयावर न्हावेली मनसे कार्यकर्ते महावितरणच्या कार्यालयात जाऊन लेखी निवेदन दिले .गावातील सर्व विजवाहिन्यावरील झाडे पावसाळ्यापूर्वी तोडून विजवाहिन्या सुरळीत कराव्यात , ज्या वीजवाहिन्यां जोडलेल्या आहेत त्यांचा दखल घ्यावी, प्रत्येक वीज पोलची पाहणी करावी , व मुख्य ट्रान्सफारमरची पाहणी करावी . अशी मागणी या निवेदनात देण्यात आली आहे . त्याच बरोबर गावातील सर्व्हिस लाईन टाकण्यासाठी ग्रामस्थांकडुन पैसे मागत असल्याच्या तक्रार करण्यात आली आहे.
यावेळी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य अक्षय पार्सेकर, साहिल मांजरेकर,चेतन पार्सेकर, अमोल पार्सेकर, समीर पार्सेकर,अजय पार्सेकर, प्रथमेश नाईक, सुदन पार्सेकर, उदय परब ,राज धवन, दत्तप्रसाद पार्सेकर, किरण माळकर, संकेत पार्सेकर, सावळाराम न्हावेलकर,विलास मेस्त्री, भावेश पार्सेकर , संदेश गावडे, प्रसाद आरोंदेकर, प्रथमेश आरोंदेकर,सिद्धेश पार्सेकर, संतोष मुळीक, विठ्ठल परब, माजी पोलीस पाटील न्हावेली- विजय काशिराम नाईक ,संदीप मांजरेकर व आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
या निवेदनात नमूद केलेल्या तक्रारची दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी सर्व कामे न केल्यास गावातील सर्व ग्रामस्थ व मनसेचे कार्यकर्ते एकत्र येत महावितरण करायला मनसे स्टाइल धडक मोर्चा काढू अशी तंबी देखील दिली आहे.