सावंतवाडी
येथील यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांची केपीआयटी, पुणे या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे. कंपनीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 700 विद्यार्थ्यांचे इंटरव्हयू घेण्यात आले. त्यापैकी 77 विद्यार्थी हे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अंतिम फेरीत 29 विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या 5 विद्यार्थ्यांचा समावेश आहे._
_कॉलेजच्या कॉम्प्युटर विभागाच्या 3 व इलेक्ट्रिकल विभागाच्या 2 विद्यार्थ्यांची यामध्ये निवड झाली आहे. विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे – मैथिली धुरी, सोमेश राजे व प्रसन्न कद्रेकर (तृतीय वर्ष कॉम्प्युटर ) साहिल गावडे व चंद्रकांत भालेकर (तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल)_
_निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रु.चार लाख वेतन व इतर सोयी सुविधा कंपनीमार्फत देण्यात येणार आहेत. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले व प्राचार्य गजानन भोसले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या._