You are currently viewing दुसऱ्यांदा बेपत्ता झालेला तो युवक अखेर सापडला

दुसऱ्यांदा बेपत्ता झालेला तो युवक अखेर सापडला

सावंतवाडी पोलिसांनी ठाण्यातून घेतले ताब्यात चौकशी सुरु : गुढ उलगडणार ?

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील उभा बाजार परिसरात राहणाऱ्या नीलिमा खानविलकर आणि शालिनी सावंत या वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात चौकशीसाठी बोलावल्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केलेला व दुसऱ्यांदा बेपत्ता झालेला तो युवक अखेर सापडला आहे.

सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ठाणे येथून त्याला ताब्यात घेतले. त्याला सावंतवाडी येथे आणण्यात आले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्या वारंवार गायब होण्यामूळे त्याच्याबाबत संशय निर्माण झाला असून त्याच्या जबानीनंतरच या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =