You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

शिक्षकांना लेखणी दिली भेट

जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वखर्चाने राबवला उपक्रम

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी पदरमोड करत वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावातील केंद्रशाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, जिल्हा सरचिटणीस रुपेश जाधव, कणकवली विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कुर्ली ग्रा पं सदस्य योगेश कदम, मुख्याध्यापक संजय पारधी, शिक्षक विलास राठोड, शिक्षक अमर पाटील, ग्रामस्थ आबासाहेब कदम, रुपेश पवार, अक्षय पाटील, सखाराम हुंबे, दिनेश पारकर, रुपेश पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा 21 जून रोजी वाढदिवस आहे. जिल्हाध्यक्ष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांसह सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी स्वखर्चाने कुर्ली गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाटी, पेन्सिल, वह्या आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देऊन भावी पिढी घडवणाऱ्या गुरुजनांना पेन भेट देत त्यांचाही सन्मान केला.यावेळी बोलताना अनंत पिळणकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस हा एक सामाजिक उपक्रम असतो. जिल्हाध्यक्ष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त याआधी सामाजिक उपक्रम राबवत असताना 500 वृक्ष वाटप केले आहे. तसेच रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे. सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या शाळेत मी बालपणी मुळाक्षरे गिरवली, शिक्षणाचा श्रीगणेशा केला त्या माझ्या कुर्ली गावातील केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करताना आनंद होत आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक सुविधांचा सुयोग्य वापर करून आपले करिअर घडवावेच पण त्यासोबतच सुजाण नागरिक सुद्धा बनावे. कुर्ली केंद्रशाळेला आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा पुरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणीक गरजा मला कळवाव्यात त्या मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करेन.मुख्याध्यापक संजय पारधी म्हणाले की अनंत पिळणकर यांनी नेहमीच कुर्ली केंद्रशालेला सढळ हस्ते मदत केली आहे. संगणकीय काम करण्यासाठी अत्यावश्यक असलेला कॉम्प्युटर सुद्धा स्वखर्चाने पिळणकर यांनी यापूर्वी शाळेला प्रदान केला आहे. माजी विद्यार्थी आणि जबाबदार राजकीय पदाधिकारी म्हणून अनंत पिळणकर यांचे आमच्या शाळेला नेहमीच सहकार्य असते. नव्या कोऱ्या वह्या, पाटी पेन्सिल मिळताच शालेय मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमर पाटील यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा