केंद्रशाळा शेर्पेला देणगीतून शैक्षणिक साहित्य संच भेट
शैक्षणिक वर्ष 2023 – 24 करीता केंद्रशाळा शेर्पेच्या55 मुलांकरिता सेवा सहयोग संस्था ठाणे , मुंबई व शिवसंग्राम संघटना मुंबई यांच्या योगदानातून व देणगीतून केंद्रशाळा शेर्पेच्या 100% विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर ,वह्या ,पेन , कंपास पेटी , सिस पेन्सिल बॉक्स ,रंग इत्यादी शैक्षणिक साहित्य संच दोन्ही संस्थांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले .हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .सदर कार्यक्रमाला स्मिता पांचाळ सरपंच ग्रामपंचायत शेर्पे ,संतोष ब्रह्मदंडे -सरपंच कुरंगवणे ,सिराज मुजावर उपसरपंच शेर्पे, शितल कांबळे ग्रामपंचायत सदस्य शेर्पे, रवींद्र पवार ग्रामपंचायत सदस्य कुरंगवणे ,शेर्पे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष – विलास पांचाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष – सत्यविजय शेलार ,उपाध्यक्ष – प्राजक्ता राऊत ,मुख्याध्यापक – दशरथ शिंगारे त्याचप्रमाणे सेवासयोग संस्थेचे पदाधिकारी तथा शाळेचे माजी विद्यार्थी ज्योती तेली ,दीपक पाष्टे ,किशोर शेलार ,प्रकाश भागवडे, वैशाली शेलार ,प्रतिभा पवार ,विलास पतयान, शिवसंग्राम संघटना प्रतिनिधी सदानंद राणे ,शिवाजी कदम, रवींद्र पवार आदी उपस्थित होते .सेवा सहयोग संस्था मुंबई यांच्यामार्फत साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी प्रकाश तेली -शेर्पे हायस्कूल शिपाई ,निशा गुरव -माजी सरपंच शेर्पे, विनोद शेलार -पोलीस पाटील शेर्पे यांचे विशेष सहकार्य लाभले . सदर कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र जठार म्हणाले केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थी शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टिकोनातून चांगल्या प्रकारचे काम सुरू आहे . या ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी ,पालक यांचा चांगला समन्वय दिसून येतो .विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचा वापर चांगल्या प्रकारे वापर करावा तसेच आपण लक्षात ठेवून आपण मोठे झाल्यावर आपल्या शाळेतील बांधवांसाठी काहीतरी करण्याची उमेद ठेवा .आणि सेवा सहयोग संस्था व शिवसंग्राम संघटना या संघटनेचे पदाधिकारी हे आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत . त्यांच्या योगदानाबद्दल व सहकार्याबद्दल विशेष कौतुक केले .त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्मिता पांचाळ सरपंच ग्रामपंचायत शेर्पे, संतोष ब्रह्मदंडे सरपंच कुरंगवणे , सेवा संयोग संस्थेच्या वतीने दीपक पाष्टे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक अमरीन शेख, मोहिनी पाटील ,कविता हरकुळकर,शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य केंद्रशाळा शेर्पे, सर्व माता पालक संघ सदस्य, सर्व शिक्षक पालक संघ सदस्य सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले .संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक दशरथ शिंगारे .छायाचित्रण -अमरीन शेख व आभार प्रदर्शन -मोहिनी पाटील यांनी केले .