सावंतवाडी
खासदार विनायक राऊत यांचा पराभव करण्याची भाषा करणार्या केसरकरांनी आपली काळजी करावी तुमची सावंतवाडी सुध्दा तुमच्या ताब्यात नाही ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही नगरसेवक म्हणून उभे राहिलात तरी शिवसैनिक तुमचा पाडाव करतील, असा इशारा ही त्यांनी येथे दिला.
आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. डिसोझा यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, या ठिकाणी शिवसैनिकांना फसविण्याचे काम केसरकरांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अनेकांना रोजगारांची आश्वासने देण्यात आली. परंतू कोणालाही रोजगार मिळाले नाहीत. ही वस्तूस्थिती आहे. शिवसेनेत असताना आपल्याला काम करायला दिले जात नाही, असा दिखावूपणा श्री. केसरकर यांनी केला. मात्र आत्ता नेमके तुमचे हात कोणी धरले आहेत. याचे उत्तर त्यांनी मतदारांना द्याव. चांदा ते बांदा योजना आता का यशस्वी होवू शकत नाही? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, सावंतवाडी शहरात आपला दवाखाना सुरू केला. मात्र अद्याप त्या ठिकाणी डॉक्टरच नाहीत. ही जनतेची चेष्टा आहे, तर गेल्या वर्षभरात त्यांनी कुठचे विकास कामे केले, हे देखील त्यांनी जाहीर करावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.