You are currently viewing सावंतवाडी आयोजित नेमबाजी प्रशिक्षण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

सावंतवाडी आयोजित नेमबाजी प्रशिक्षण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…

सावंतवाडी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नेमबाजी प्रशिक्षण शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरात जिल्ह्यातील ५६ क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. उपरकर शूटिंगच्या माध्यमातून येथील भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये विविध खेळांसोबत नेमबाजी या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक व राष्ट्रीय नेमबाज श्री. कांचन उपरकर यांनी नेमबाजी या क्रीडा प्रकाराची प्राथमिक माहिती, सुरक्षित बंदूक कशी हाताळायची,नेमबाजी मधील विविध प्रकार, घेण्यात येणाऱ्या स्पर्धा, वापरल्या जाणाऱ्या बंदुका, स्पर्धेचे नियम व वयोगट इत्यादीची माहिती दिली तसेच बंदूक चालवण्याचे प्रात्यक्षिकही दाखविले व शालेय स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून सहभागी होण्याचे आवाहनही केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा