विज्ञान प्रदर्शनात दत्ताराम सावंत यांचा तालुक्यात प्रथम क्रमांक
अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य गटात यश; सरमळे शितप शाळेचा गौरव
सावंतवाडी :
५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सरमळे शितपचे मुख्याध्यापक दत्ताराम सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, चराठे येथे आयोजित प्रदर्शनात त्यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे प्रभावी सादरीकरण केले. गेल्या २० ते २५ वर्षांपासून ते विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर सातत्याने यश मिळवत आहेत. त्यांचे ‘विज्ञान रंजन-मनोरंजन’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
