You are currently viewing ‘स्वच्छ तरंदळे, सुंदर तरंदळे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘स्वच्छ तरंदळे, सुंदर तरंदळे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘स्वच्छ तरंदळे, सुंदर तरंदळे’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम; महिला भगिनींसह ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग

तरंदळे :

‘स्वच्छ तरंदळे, सुंदर तरंदळे’ हा संकल्प घेऊन ग्रामपंचायत तरंदळेच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत गावातील महिला भगिनी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी श्रमदान केले.

या अभियानांतर्गत गावातील रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा, पालापाचोळा तसेच परिसरातील अस्वच्छता दूर करण्यात आली. ग्रामस्थांनी एकत्र येत स्वच्छतेचा संदेश देत गावाच्या स्वच्छतेची जबाबदारी सामूहिकपणे पार पाडली.

यावेळी सरपंच सुशिल कदम, उपसरपंच शुभावली सावंत, पंचायत समिती सदस्य संजना राणे, ग्रामपंचायत अधिकारी मनस्वी माळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनीलदत्त जाधव, सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी तंटामुक्ती अध्यक्ष डॉ. सत्यवान राणे उपस्थित होते.

तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अभय सावंत, वनिता कदम आणि जय राणे यांनीही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.

‘स्वच्छता हीच खरी सेवा’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून गावाच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असा संदेश देण्यात आला. अभियानात सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा