You are currently viewing जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर 2026 रोजी सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर 2026 रोजी सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त ३ डिसेंबर 2026 रोजी सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय दिव्यांग मेळावा

कणकवली बसस्थानकातून भव्य रॅली; मातोश्री मंगल कार्यालय येथे मेळाव्याची सांगता

सिंधुदुर्ग :

जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या, हक्क, अधिकार तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दिनांक ३ डिसेंबर २०२६ रोजी मातोश्री मंगल कार्यालय येथे सकाळी ९:३० वाजता जिल्हास्तरीय दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग, रोटरी क्लब कणकवली, कोकण कला व विकास संस्था सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग,एकता दिव्यांग विकास कणकवली,कोकण कला शिक्षण व विकास संस्था, महाराष्ट्र ग्रामीण बँक ओसरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात कणकवली बसस्थानक येथून भव्य जनजागृती रॅलीने होणार असून, ही रॅली मातोश्री मंगल कार्यालय येथे पोहोचणार आहे. त्यानंतर रॅलीची सांगता होऊन या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या मेळाव्यामध्ये शासकीय व निमशासकीय योजनांची माहिती, व मार्गदर्शन,बँक कर्ज योजनेची माहिती, दिव्यांग साहित्याची नोंदणी, करण्यात येणार आहे. तसेच उपस्थितीत दिव्यांग बांधवांना भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे.
या मेळाव्यास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. नितेश राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच रोटरी क्लबच्या अध्यक्षा सुप्रिया नलावडे मॅडम, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती, मा.जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे मॅडम तसेच कोकण कला व विकास संस्थेचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना एकत्र आणून त्यांच्या विविध समस्या, शासकीय योजना, हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या जिल्हास्तरीय मेळाव्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधव, पालक, सामाजिक संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

टीप: सर्व दिव्यांग बांधवांनी ३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता कणकवली बस स्टँड वर यायचे आहे. तेथून रॅलीची सुरुवात होणार आहे.
नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे.जे नावनोंदणी करणार त्यांनाच भेटवस्तू दिली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क: संस्था अध्यक्ष श्री.अनिल शिंगाडे सर : 9765979450, ऑफीस कसाल: 9623655142, DDRC: 9322073992

प्रतिक्रिया व्यक्त करा