You are currently viewing घारपी शाळेत संविधान सन्मान दिवस विविध उपक्रमांनी साजरा

घारपी शाळेत संविधान सन्मान दिवस विविध उपक्रमांनी साजरा

घारपी शाळेत संविधान सन्मान दिवस विविध उपक्रमांनी साजरा

२६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

*बांदा*

सह्याद्रीच्या दुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद घारपी शाळेत संविधान सन्मान दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संविधान उद्देशिकेच्या सामुदायिक वाचनाने करण्यात आली. विद्यार्थी, शिक्षकांनी एका सुरात उद्देशिकेचे वाचन करून संविधानाप्रती आदर व्यक्त केला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी संविधानाचे मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये लेखन केले. तसेच संविधानावर आधारित रांगोळी रेखाटन व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या व चित्रांनी लक्ष वेधून घेतले.
यावेळी २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे १८ वर्षांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या जवानांना व नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी दोन मिनिटे मौन पाळून शहिदांना अभिवादन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक जे. डी. पाटील, सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा