प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बंगला उभारणाऱ्या महादेव राठवड यांचे माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडून कौतुक!
बोर्डवे येथे निवासस्थानी भेट देत राऊत यांनी दिल्या राठवड कुटुंबीयांना शुभेच्छा; गावाच्या विकासात्मक व संघटनात्मक विषयांवरही चर्चा
बोर्डवे :
रिक्षा व्यवसाय, जांभळांचा व्यवसाय तसेच जत्रोत्सवात छोटेसे दुकान थाटून स्वतःच्या कष्टातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बोर्डवे गावचे ग्रामपंचायत सदस्य व कट्टर शिवसैनिक महादेव राठवड यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःचा सुंदर बंगला उभारला आहे. त्यांच्या या जिद्दीचे आणि कष्टाचे कौतुक करण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी विनायक राऊत यांनी महादेव राठवड यांच्या संघर्षमय वाटचालीचे मनापासून कौतुक केले. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कळसुली विभागप्रमुख चंद्रहास ऊर्फ बबली राणे, मुंबईस्थित उद्योगपती व बोर्डवे गावचे सुपुत्र गणेश सावंत, महादेव राठवड, क्रिकेटप्रेमी विशाल येनडे, विराज येनडे, निलेश परब, साई पालव, विठोबा राठवड तसेच राठवड कुटुंबीय उपस्थित होते.
या भेटीदरम्यान गावातील संघटनात्मक बांधणी आणि विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. माजी खासदार विनायक राऊत यांचा हा धावता दौरा असल्याने पुढील भेटीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
