*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*झाशीची राणी*
००००००००
सुंदर होती गुलाबा परी रूपयौवना राणी
तलवार तिची ज्वाळा ओकी खूप तळपते राणी
जीव असेतो जिवात माझ्या झाशी राही माझी
असे कुणाची हिंमत त्याने घ्यावी झाशी माझी
रणांगणीच्या यज्ञ कुंडी ती जीवन समिधा वाही
राज्य आमुचे कुणा शत्रूला मिळे ना कधी ग्वाही
खवळे राणी वाघीण जणू समजे धावे हय तो
शत्रूस भिडली लढता लढता आघात वर्मी होतो
भूवर पडली रुधिरे भिजली शांत जाहली राणी
अंकावरती माथा घेई जोजवी तिला धरणी
झाली नाही अशी जगीही शूर वीर ती कोणी
झाशीच्या त्या किल्यावरती आजही वसे राणी
विद्या रानडे
