You are currently viewing सर्वसामान्यांचा लेखक व कवी प्रा.इंद्रजीत भालेराव
Oplus_16908288

सर्वसामान्यांचा लेखक व कवी प्रा.इंद्रजीत भालेराव

*अमरावती येथे होणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री इंद्रजीत भालेराव*

 

*सर्वसामान्यांचा लेखक व कवी प्रा.इंद्रजीत भालेराव* 

 

अमरावती येथे येत्या 14 व 15 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय शब्दवेल साहित्य संमेलन भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात अमरावती येथे होत आहे. या सहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक परभणीचे प्रा. इंद्रजीत भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. आज इंद्रजीत भालेराव हे नाव महाराष्ट्राला अपरिचित असे राहिलेले नाही. आपल्या सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर शेतकऱ्यांवर तरुणांवर लिहिलेल्या समर्पक व जिवंत कवितांमुळे व तत्सम साहित्यामुळे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहेत.

 

प्रा. इंद्रजीत भालेराव हे मराठीचे प्राध्यापक. परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयामधून सेवानिवृत्त झालेले. त्यांचे बालपण ज्या जडणघडणीत घडले त्याला सर्व पार्श्वभूमी आहे ती ग्रामीण भागाची आणि हीच पार्श्वभूमी प्रतिबिंबित झाली त्यांच्या कवितांमध्ये व लेखनामध्ये त्यामुळे त्यात अस्सल जिवंतपणा आला आहे आणि त्यामुळे त्यांचे लेखन हे हृदयस्पर्शी झाले आहे. याशिवाय त्यांची मांडण्याची आकर्षक शैली व तरुण तडफदार व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्या कविता समोरच्या व्यक्तीवर आपली छाप पाडून जातात. कविता हृदयावर विजय मिळून जाते याला खूप मोठी ताकद लागते आणि ती ताकद प्रा. इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांमध्ये निश्चितच आहे.

 

महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांच्या कवितांचे व व्याख्यानाचे कार्यक्रम झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाचे तसेच महाराष्ट्रातील इतर प्रतिष्ठित संस्थांचे अतिशय प्रतिष्ठित असे पुरस्कार सन्मान त्यांना प्राप्त झालेले आहे. हे पुरस्कार म्हणजे त्यांनी जे बेंबीच्या देठापासून लिहिले सत्य लिहिले ते सत्य लोकांपर्यंत पोहोचविले त्याचा हा यथोचित गौरव आहे.

 

मागे मी लेडी गव्हर्नर श्रीमती कमलताई गवई यांच्यासह स्वर्गीय वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी येथे महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मी परभणीला गेलो तर इंद्रजीत भालेराव यांची भेट हे समीकरण ठरलेले आहे. मी इंद्रजीतला फोन केला आणि मी व कमलताई गवई आपल्या भेटीला येत आहोत असे सांगितले. आम्ही तर खरं इंद्रजीतचा सत्कार करायला गेलो होतो पण गेल्या गेल्या इंद्रजीतनेच आमचा सत्कार करून टाकला. कमलताई गवई आपल्या घरी आलेल्या पाहून इंद्रजीतला धन्य धन्य वाटले आणि ते लगेच त्याने दुसऱ्या आठवड्यात लिहिलेल्या लेखांमध्ये व्यक्तही करून दाखविले.

 

इंद्रजीतचे व्यक्तिमत्व देखणे आहे. त्याचे सादरीकरण दैदिप्यमान आहे. कारण त्याला अनुभवाची जोड आहे. त्यामुळे त्याच्या कवितेतील प्रत्यक्ष शब्द आणि शब्द लोकांच्या हृदयाचा ठाव घेतो हे वेगळे सांगणे न लगे.

 

इंद्रजीत जसा आपल्या कवितेतून बोलतो लेखातून लिहितो तसाच वागतो. नाहीतर लिहिणे वेगळे आणि वागणे वेगळे असे त्याचे नाही. त्यामुळे जो जो इंद्रजीत भालेराव यांना भेटला त्यांच्या हृदयात इंद्रजीत जाऊन बसला इतकी माणुसकी त्याच्यामध्ये आणि त्याच्या परिवारामध्ये आहे. प्राध्यापक असला मोठा साहित्यिक असला तरी घरी असा कुठला बडेजावपणा मला दिसला नाही. साधीसुधी ही माणसे माझ्या कवितेची धनी या ओळीप्रमाणे तो वागतो.

 

शेतकऱ्यांवर लिहिलेल्या कविता तर मनापासून दाद घेऊन जातात. कारण इंद्रजीत ते जीवन स्वतः जगला आहे. शेतकऱ्यांचे दुःख त्याच्या हृदयात जाऊन बसले आहे आणि ते लेखणी होऊन त्याच्या हृदयातून बाहेर पडून रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचले आहे. इंद्रजीत आता जरी सेवानिवृत्त झाला असला तरी सेवानिवृत्त झाल्यासारखा वाटत नाही इतके चांगले व्यक्तिमत्व त्याचे आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी लिहिलेली पुस्तके मोठ्या प्रमाणात विकत घेतो व ते इतरांना सप्रेम भेट देतो. भेटीच्या वेळेस भालेराव परिवाराने केलेले आदरतिथ्य नमूद करण्यासारखेच असते.

 

साहित्य संमेलनाचे आता विकेंद्रीकरण होत आहे. जागोजागी साहित्य संमेलने होत आहेत. ही खरोखरच महाराष्ट्राच्या प्रगतीची लक्षणे आहेत. कुणीतरी एका मोठ्या तत्ववक्त्याने म्हटलेले आहे की कोणताही देश ओळखला जातो तो तिथल्या साहित्यिकांमुळे. रवींद्रनाथ टागोरंमुळे भारत जगात ओळखला जातो. त्याचप्रमाणे शेक्सपियर लिओ टॉलस्ट्राय काय यांच्याबाबतही असेच म्हणावे लागेल. गावोगावी होणारी साहित्य संमेलने व साहित्यिक कार्यक्रम हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा प्राण आहे. महाराष्ट्राला प्रतिबिंबित करण्याचे ते एक योग्य साधन आहे. शब्दवेल साहित्य चळवळ ही अशीच एक सशक्त साहित्य चळवळ आहे आणि या चळवळीने इंद्रजीत भालेराव यांना सहाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची अध्यक्षपद देऊन इंद्रजीत भालेराव यांनी साहित्य विश्वात केलेल्या विक्रमाला तो मानाचा मुजरा आहे. यानिमित्त श्री इंद्रजीत भालेराव यांना हार्दिक शुभेच्छा.

 

 

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा