*जागतिक साकव्य विकास मंच सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माणुसकीचा धर्म*
माणुसकी हाच धर्म मोठा,
त्याविण जीवन व्यर्थ छोटा ॥ध्रु॥
माणूस म्हणजे नुसती काया,
कायेत असते प्रेमाची माया,
जात पात ना त्याची छाया,
माणुसकीतच परमेश्वराची माया ॥१॥
भुकेल्याला घास द्यावा,
तहानल्याला पाणी द्यावा,
पडलेल्याला हात द्यावा,
हाच धर्म मनी ध्यावा ॥२॥
मंदिरी जाऊन घंटा वाजविली,
माळ हाती घेऊन फिरविली,
माणुसकी जर विसरविली,
तर ती भक्ती व्यर्थ गेली ॥३॥
प्रभाकर म्हणे ऐका सार,
माणुसकीचाच करा विचार,
माणसातच देवा निराकार,
हाच धर्माचा खरा आधार ॥४॥
श्री प्रभाकर भामरे (इंदुमाय)
९४२०३७३२६१.
