You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या आराध्या गावडेचे विभागीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या आराध्या गावडेचे विभागीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या आराध्या गावडेचे विभागीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश!

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडी या विद्यालयाची गुणवंत विद्यार्थिनी कु. आराध्या गावडे हिने विभागीय स्तरावरील कराटे स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कराटेसारख्या साहसी आणि कौशल्यपूर्ण खेळात सातत्यपूर्ण सराव, शिस्त, जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर आराध्याने हे यश मिळवले आहे. तिच्या या कामगिरीमुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळणार आहे.
आराध्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत यांनी तिचे विशेष अभिनंदन केले.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, क्रीडा शिक्षक श्री. भूषण परब, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनीही आराध्याचे कौतुक करून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा