You are currently viewing बेळगावच्या महापौर व उपमहापौरांच्या प्रमुख उपस्थितीत कलाशिखर परिषद व गौरव सोहळा दिमाखात संपन्न!

बेळगावच्या महापौर व उपमहापौरांच्या प्रमुख उपस्थितीत कलाशिखर परिषद व गौरव सोहळा दिमाखात संपन्न!

बेळगावच्या महापौर व उपमहापौरांच्या प्रमुख उपस्थितीत कलाशिखर परिषद व गौरव सोहळा दिमाखात संपन्न!

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

बेळगाव :

श्री गजेंद्र शाम कोठावळे GSK FILM PRODUCTION, सिंधुदुर्ग आणि स्वामी समर्थ क्रियेशन, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली कलाशिखर परिषद व गौरव सोहळा २०२६ ही भव्य आणि दिमाखदार सोहळ्याच्या वातावरणात बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनमध्ये उत्साहात संपन्न झाली.

कला, सामाजिक कार्य, कृषी, शैक्षणिक आणि बालकला अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील गुणवंत व्यक्तींचा या सोहळ्यात विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. यामध्ये कलागौरव, समाजगौरव, कृषीगौरव, आदर्श शिक्षक गौरव आणि बालकलागौरव अशा विविध पुरस्कारांचा समावेश होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगावच्या महापौर श्रीमती प्रीती विनायक कामकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे उपमहापौर श्री हनुमंत कोंगली, अभिनेत्री व नाट्यकर्मी श्रीमती मीरा आजगावकर, एंजल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती मीनाताई बेनके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीमती अनुपमा धाकोजी, कलाकार व उद्योजक श्री पांडुरंग मजुकर, पत्रकार श्री गोपाळ नेमाणी पाटील तसेच निवृत्त कॅप्टन श्री मनोहन लोमाना कित्तूर उपस्थित होते.

या सोहळ्यात स्नेहा ताशीलदार, सूरज पाटील, डॉ. मयुरी जाधव, परशुराम बोकडे, निलेश मुतगेकर, अश्विनी नाईक, शंकर राक्षे, जांगळू शहापूरकर, गजानन कोकितकर, प्रल्हाद पाटील, पवन शिनोळकर, भुजंग कनकुंबकर, श्रुतिका पाटील, बाबू सिद्राय, रेणुका पाटील, सरस्वती होनगेकर, लक्ष्मी वाईंगडे, शर्वरी वर्पे, संजना कुकनूर, विनायक पाटील, अशोक मोहिते, डॉ. मंजू राजेजाधव, मिलिंद खोब्रागडे, वाणी केरकलमट्टी, शांताराम भादवणकर, बाबासाहेब मायनणवर आणि डॉ. तुकाराम पवार यांच्यासह विविध मान्यवरांना गौरविण्यात आले.

याशिवाय श्री कलमेश्वर भजनी मंडळ, कल्लेहोळ आणि श्री जिव्हेश्वर महिला भजनी मंडळ, वडगाव (बेळगाव) या भजनी मंडळांचाही विशेष सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रांत निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन आणि सन्मान देण्याचा स्तुत्य उपक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रुची आईर यांनी प्रभावीपणे केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री गजेंद्र शाम कोठावळे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनाची जबाबदारी श्री संतोष बाचिकर, श्री प्रल्हाद पाटील, श्री पुंडलिक पाटील आणि श्री श्रीकांत पाटील यांनी उत्तमरीत्या सांभाळली. कार्यक्रमातील सुंदर क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून टिपण्याचे काम श्री संतोष बाचिकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री महादेव होनगेकर यांनी केले.

कलेचा सन्मान, कलाकारांचा गौरव आणि समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कलाशिखर परिषद व गौरव सोहळ्याने बेळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी छाप उमटवली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील कला, सामाजिक बांधिलकी, कर्तृत्व आणि प्रतिभेचा सुंदर संगम घडवणारा हा सोहळा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा