You are currently viewing NAB सिंधुदुर्गचा दीपावली भेट कार्यक्रम आता ६ नोव्हेंबरला!

NAB सिंधुदुर्गचा दीपावली भेट कार्यक्रम आता ६ नोव्हेंबरला!

NAB सिंधुदुर्गचा दीपावली भेट कार्यक्रम आता ६ नोव्हेंबरला!

विशाल परब यांच्या हस्ते दृष्टिबाधित लाभार्थ्यांना फराळ, साडी व टी-शर्टचे वाटप; सकाळी ११ वाजता भटवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयात आयोजन

सावंतवाडी :

नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), सिंधुदुर्ग, सावंतवाडी यांच्या वतीने दृष्टिबाधित लाभार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला दीपावली भेट कार्यक्रम आता रविवार, १ नोव्हेंबर २०२६ ऐवजी शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. दृष्टिबाधित लाभार्थ्यांच्या सोयीचा विचार करून कार्यक्रमाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भटवाडी, सावंतवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला भाजपचे युवा नेते मा. विशालजी परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते दृष्टिबाधित लाभार्थ्यांना दिवाळी फराळ, साड्या आणि टी-शर्टचे वाटप करण्यात येणार आहे.
विशालजी परब हे प्रथमच NAB सिंधुदुर्ग संस्थेला भेट देणार आहेत. संस्थेच्या कार्याची माहिती घेणे आणि संस्थेला सहाय्य मिळण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
या दीपावली भेट कार्यक्रमाला सर्व दृष्टिबाधित लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. तसेच NAB संस्थेशी संबंधित आश्रयदाते, सहाय्यक, रोटरी क्लब, लायन्स क्लब, समता महिला मंडळ, इनरव्हील क्लब आणि इतर हितचिंतकांनीही उपस्थित राहून या आनंददायी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन NAB सिंधुदुर्गचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर आणि सचिव सोमनाथ जिनी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा