आमदार नितेश राणेंनी दिले 100 पोर्टेबल ऑक्सिजन कॅन

आमदार नितेश राणेंनी दिले 100 पोर्टेबल ऑक्सिजन कॅन

सिंधुदुर्ग :

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने रुग्णांना श्वास घेण्यास निर्माण होणारा अडथळा आणि त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याने आमदार नितेश राणे यांनी रुग्णांसाठी ‘पोर्टेबल ऑक्सिजन कॅन’ उपलब्ध केले असून मंगळवार पासून त्याचे वाटप होणार आहे.

oxy99 या पोर्टेबल कॅन मध्ये 6 लिटर ऑक्सिजन असून इमर्जन्सी च्या वेळेस रुग्णाला या कॅनचा वापर करून ऑक्सिजन पातळी वाढवण्यास मदत होते, हा छोटासा कॅन कुठेही घेऊन फिरता येऊ शकतो. आमदार नितेश राणे यांनी उपलब्ध केलेल्या oxy99 कॅन मुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा