*जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वृत्त : हिरण्यकेशी*
*कथा मनाची*
कथा मनाची कुणास सांगू, घरात कोणी सवेच नाही
बुडून आहे स्वतःत जो तो जगात त्यांच्या प्रवेश नाही
चला म्हणावे घरास गावी, मिळून गाऊ सुरेल गाणी
मुलांत नाचू, नदीत डुंबू पिऊन घेऊ पवित्र पाणी
कुणास त्याचे महत्व नाही तिथे कुणाचा निवेश नाही
बुडून आहे स्वतःत जो तो जगात त्यांच्या प्रवेश नाही
मुला, पहा रे इथे विराजे पुराण पोथी अभंग गाथा
समोर त्याच्या अजून नक्की विभोर भावे झुकेल माथा
नकोत त्यांना पुराण शास्त्रे मनात त्यांच्या सुवेश पाही
बुडून आहे स्वतःत जो तो जगात त्यांच्या प्रवेश नाही
कुठे तरीही अजून थोडी टिकून आहे घरात नाती
म्हणून सारे कुटुंब तेथे असीम भावे जनात न्हाती
अनाथ झाली घरे तयांना जरा जरासे वळून पाही
बुडून आहे स्वतःत जो तो जगात त्यांच्या प्रवेश नाही
श्रीनिवास गडकरी
बावधन पुणे
@सर्व हक्क सुरक्षित
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
29.10.2026
मोबाईल 9130861304
