साळगाव महाविद्यालयात “सुरक्षित बचपन अभियान” कार्यक्रम संपन्न..!
कुडाळ
परम पूज्य विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय साळगाव
मध्ये सुरक्षित बचपन अभियान हा कार्यक्रम प्रमुख मान्यवरांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 (POCSO Act) या विषयावर संपूर्ण सखोल मार्गदर्शन व जनजागृती मोहीम या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अंतर्गत करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती एन ए बकरे , दिवाणी न्यायाधीश कुडाळ यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले तसेच एडवोकेट विवेक मांडकुलकर एडवोकेट तृप्ती प्रभू देसाई पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद काळसेकर या मान्यवरांचा शाल श्रीफळ व आभार पत्र देऊन सन्मान करण्यात आला क्रमांकाचे अध्यक्ष म्हणून संस्था अध्यक्ष श्री मुकुंद धुरी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सचिन पाटकर शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सलीम तकीलदार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर तीन च्या मुख्याध्यापिका मनीषा गोवेकर
