You are currently viewing बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धा

बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धा

बांदा येथे ७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धा

खुल्या गटासाठी २५ हजार ५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक; लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे

सावंतवाडी :

दिवाळीनिमित्त आमची वाडी देऊळवाडी आणि पिंपळेश्वर युवक मित्रमंडळ, बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता श्री देव पिंपळेश्वर मंदिर परिसरात नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी २५ हजार ५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार ५५५ रुपये पारितोषिक आहे. बांदा मर्यादित गटात अनुक्रमे १२ हजार ७७७, ८ हजार ८८८ आणि ४ हजार ४४४ रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेनिमित्त आयोजित लकी ड्रॉमध्ये वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, कुलरसह अन्य पाच आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कुपनाची किंमत ५० रुपये असून, ६ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी करावी.
मंडळाच्या अध्यक्षपदी आकाश सावंत, उपाध्यक्षपदी गौरव सावंत, खजिनदारपदी आशिष सावंत आणि सचिवपदी रोहन सुपल यांची निवड झाली आहे. अधिक माहितीसाठी आशिष सावंत (७०५८३२२७०६), गौरांक साळगावकर (७०५८५५९२१६) किंवा देवेश वारंग (७०५७५६८४८६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा