You are currently viewing अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात संशयिताची निर्दोष मुक्तता

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात संशयिताची निर्दोष मुक्तता

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात संशयिताची निर्दोष मुक्तता;

अॅड. अशपाक शेख यांनी  केला प्रभावी युक्तिवाद

सावंतवाडी

कारिवडे, ता. सावंतवाडी येथील पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जाऊन बळजबरीने तिच्याशी अंगलट करून विनयभंग केल्याच्या गंभीर प्रकरणात संशयित आरोपीची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४१/२०२२ अन्वये भा.दं.वि. (IPC) कलम ३५४,३५४(A),३५४(A)(१)(i) व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ (POCSO Act) कलम ७, ८, १२. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनांक २४/०३/२०२२ रोजी रात्री आरोपी विकास पुंडलिक शेट्ये (वय ३९ वर्षे, रा. कारिवडे, देऊळवाडी ता. सावंतवाडी याने घरातील अल्पवयीन मुलीवर बळजबरीने मिठी मारत तिच्याशी अंगलट करून विनयभंग केल्याच्या २४/०३/२०२२ रोजी सावंतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करून मे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
मे. न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून अल्पवयीन मुलीसोबत विनयभंग झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, आरोपीचे वकील अॅड. अशपाक शेख यांनी सरकारी पक्ष सदर कथित घटनेस कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, ही अत्यंत महत्त्वाची बाब मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच तपासातील गंभीर त्रुटी व साक्षी – पुराव्यांमधील विसंगती त्यांनी ठळकपणे मांडली.
बचाव पक्षाचा हा युक्तिवाद आणि तपासातील त्रुटी ग्राह्य धरून, मा. विशेष न्यायाधीश श्री. एस. टी. त्रिपाठी साहेब यांनी दिनांक २६/१०/२०२६ रोजी आरोपीची सर्व आरोपातून ससन्मान निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिला.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने वकील अॅड. अशपाक शेख यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला असून, त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, ॲड. भुषण कदम व अॅड. हरेश वरावडेकर आणि अॅड. आसिम मुजावर यांनी सहाय्य केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा