You are currently viewing ओसरगाव खासकीलवाडीतील बाळा नाईक यांचे दातृत्व; रेशन दुकानासाठी सहा खुर्च्यांचा सेट भेट

ओसरगाव खासकीलवाडीतील बाळा नाईक यांचे दातृत्व; रेशन दुकानासाठी सहा खुर्च्यांचा सेट भेट

ओसरगाव खासकीलवाडीतील बाळा नाईक यांचे दातृत्व; रेशन दुकानासाठी सहा खुर्च्यांचा सेट भेट

कळसुली विभागप्रमुख बबली राणे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन सन्मान; ग्रामस्थांकडून कौतुक व आभार

ओसरगाव

ओसरगाव खासकीलवाडीचे सुपुत्र श्री. विठ्ठल उर्फ बाळा नाईक यांनी रेशन दुकानात येणाऱ्या ग्रामस्थांना बसण्यासाठी स्वखर्चाने सहा खुर्च्यांचा सेट मोफत भेट दिला. त्यांच्या या सामाजिक दातृत्वाबद्दल संपूर्ण गावाच्या वतीने कळसुली विभागप्रमुख तथा माजी उपसरपंच श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
रेशन दुकानात येणाऱ्या ग्रामस्थांना बसण्यासाठी खुर्च्यांची आवश्यकता लक्षात घेऊन बाळा नाईक यांनी पुढाकार घेत ही मदत केली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले.
याप्रसंगी श्री. व सौ. प्रभाकर सावंत, सौ. नंदिनी चव्हाण यांच्यासह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
“पैसे सर्वांकडे असतात; मात्र समाजासाठी आणि गावासाठी खर्च करण्यासाठी मोठे मन व दातृत्वाची भावना असावी लागते,” अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. बाळा नाईक यांनी केलेल्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा